व्हॉट्सऍप कट्टा   

आम्ही अजूनही शिकतोय!
 
आधीच्या पिढीकडून पैसे वाचवायला शिकलो;
नंतरच्या पिढीकडून पैसा वापरायला शिकतोय.
 
आधीच्या पिढीकडून सहवासाने नाती जपायला शिकलो;
नंतरच्या पिढीकडून डिजिटली नवीन नाती जोडायला शिकतोय.
 
आधीच्या पिढीकडून मन मारून जगायला शिकलो;
नंतरच्या पिढीकडून मन भरून जगायला शिकतोय.
 
आधीच्या पिढीने, णीश रपव र्ीीश ोीश मधली उपयुक्तता शिकवली;
नंतरच्या पिढीकडून णीश रपव ींहीेु मधली नावीन्याची गंमत अनुभवायला शिकतोय.
 
आईकडून पिकनिकलाही घरच्या पोळीभाजीची लज्जत अनुभवायला शिकलो;
मुलांकडून घरात असतानाही पिकनिक एंजॉय करायला शिकलोय.
 
आधीच्या पिढीबरोबर निरांजन लावून दिवा उजळून वाढदिवस साजरा केला;
नंतरच्या पिढीबरोबर मेणबत्ती विझवून अंधार करून वाढदिवस साजरा करायला लागलो.
 
आधीच्या पिढीने बिंबवले, घरचेच लोणी सर्वात उत्तम;
नंतरची पिढी पटवून देत आहे, अमूल बटरला पर्याय नाही.
 
थोडक्यात काय, आधीच्या पिढीने शिकवले, अधिक वर्षे कसे जगायचे ते;
तर नंतरची पिढी शिकवत आहे, मरणापर्यंत आनंद घेत कसं जगायचं ते !!
दोन्हीचं कॉकटेल बनवलं तर आयुष्य सुखाचं होईल 
---
काही गोष्टी सोडता येत नाहीत पण त्यांना सोडल्याशिवाय पुढेही जाता येत नाही ...त्यामुळे रस्ते कितीही अडचणीचे असो ध्येय पक्के आणि विचार खंबीर असतिल तर मेहनत करायची ताकत सुद्धा आपल्या मनगटात आपोआप येऊन जाते ...
बस फक्त माणूस आपल्या विचारांशी प्रामाणिक असावा ....

Related Articles